चाकूर : प्रतिनिधी
माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना जिल्हा बँकेच्यावतीने राबविल्या जात आहेत. बँकींग क्षेत्रातील अद्ययावत माहिती गावातील चेअरमनला मिळावी म्हणून मोबाईल वाटप करण्यात आले. ४२ चेअरमन यांना मोबाईलचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कॉग्रेस कमेटीचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन हे होते. शिराजोद्दीन जहागीरदार, चंद्रकांत मद्दे, पप्पू शेख, गंगाधर केराळे, शिवराज पाटील, सलीम तांबोळी, विकास महाजन, बाळू इरवाणे, नरंिसंग शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. चाकूर तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांनी वेगळा ठसा निर्माण केला असून दरवर्षीची वसुलीची परंपरा कायम ठेवत यावर्षीही बँक स्तरावर १०० टक्के वसुली करून जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला.
नवीन योजनेची माहिती गावा गावात मिळावी या उद्देशाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पतसंस्था, मजूर संस्थेचे चेअरमन यांना मोबाईलचे देण्याचा निर्णय माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा आ. धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी दि. १४ रोजी चाकुर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सह संस्थेच्या चेअरमन यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोबाईलचे वाटप करण्यात आले.