22.6 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeलातूरचाकूर बीएसएफचे ३४४ जवान देशसेवेसाठी सज्ज 

चाकूर बीएसएफचे ३४४ जवान देशसेवेसाठी सज्ज 

चाकूर : प्रतिनिधी
येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहायक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले बीएसएफचे ३४४ जवान देश सेवेसाठी ंिद ९ नोव्हेंबर रोजी सज्ज झाले असून प्रशिक्षण घेतलेल्या जवानांचा दीक्षांत समारंभ महानिरीक्षक विनीत कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राऊंडवर झाला.
येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहायक प्रशिक्षण केंद्रात ३४४ प्रशिक्षणार्थीचे जवानाचे ंिद २५ ंिडसेबर २०२३ ते ंिदनाक ९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ४४ आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शनिवारी ंिद ९ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांना दीक्षांत समारंभात देशसेवेची शपथ देण्यात आली. या शानदार शपथग्रहण सोहळ्याच्या परेडचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी गौतम कुमार यांनी केले. यावेळी सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक तथा प्रमुख पाहूणे विनीत कुमार यांना जवानांनी मानवंदना दिली. यावेळी समादेष्टा मदनपाल सिंह उपस्थित होते. दीक्षांत समारंभात देशातील महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, बिहार राज्यातून प्रशिक्षणासाठी आलेले जवान सहभागी झाले होते. प्रशिक्षीत जवानाची बैच संख्यां १८८ चे ऑल ओवर फर्स्टचे गोल्ड मेडल व ट्रॉफी प्रशिक्षीत जवान हुक्मा राम, ऑल ओवर सेकेंड चे सल्विर मेडल प्रशक्षिीत जवान रामलाल मीणा, बेस्ट इन इडोरेन्स चे मेडल प्रशिक्षीत जवान अमन पोटलिया, फायंिरगमधील अव्वल मेडल प्रशिक्षीत जवान जीतराम मीणा आणि बेस्ट इन ट्रन आउट व ड्रिलचे मेडल प्रशिक्षीत जवान नेमपाल कुमावत आणि प्रशिक्षीत जवानाची बैच संख्यां १८९ मधील ऑल ओवर फर्स्टचे गोल्ड मेडल व ट्रॉफी प्रशिक्षीत जवान मोहम्मद सोनू, ऑल ओवर सेकेंडचे सल्विर मेडल प्रशिक्षीत जवान विक्रम कुमार, बेस्ट इन इडोरेन्सचे मेडल प्रशिक्षीत जवान रिकेश कुमार मीणा, फायंिरग मधील सर्वोतकृष्ट मेडल प्रशक्षिीत जवान रोहित कुमार आणि बेस्ट इन ट्रन आउट व ड्रिल मध्ये सर्वोतकृष्ट मेडल तथा आजच्या शानदार परेडचे परेड कमांडर ट्रॉफी प्रशिक्षीत जवान गौतम कुमारनी पटकावली.
या सर्व सर्वश्रेष्ठ कामगीरी करणा-या प्रशिक्षणार्थी जवानांना महानिरीक्षक विनीत कुमार यांनी मेडल-ट्रॉफी देऊन सन्मानित केले. प्रशक्षिणाच्या कालावधीमध्ये जवानांना मूलभूत प्रशिक्षणा सोबत शारीरीक दक्षता, शस्त्रविद्या, गोळाबारूद, फील्ड क्राफ्ट, नकाशा वाचन, फिल्ड इंजिनियंिरग यासारख्या प्रशक्षिणाबरोबर आंतरिक सुरक्षा कर्तव्य, सीमा प्रबंधन, कायदे व मानवाधिकार यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी महानिरीक्षक विनीत कुमार यांनी या खडतर प्रशिक्षणानंतर हे जवान देशाच्या विविध सीमेवर कठीण परिस्थितीतही देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. देशाची सेवा व चांगले नागरिक होण्याची संधी आपणास मिळाली आहे असे सांगून प्रशिक्षीत जवानांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR