23.6 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeसोलापूरचार महिलांचे मंगळसूत्र चोरीला,बार्शी बसस्थानकावरील प्रकार

चार महिलांचे मंगळसूत्र चोरीला,बार्शी बसस्थानकावरील प्रकार

बार्शी :
बार्शी बसस्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवुन चार वेगवेगळ्या घटनेत चार महिलांचे मणी मंगळसूत्र, सोन्याचे पॅडल असा दोन लाख रुपयांचा ऐवज तोडून नेल्याचा प्रकार घडला आहे. दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हा प्रकार बार्शी बसस्थानकावर घडला. याप्रकरणात तीन महिला चोरट्यांवर शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चित्राबाई सुधाकर जाधव (वय ६० रा. तेरखेडा, ता. वाशी जि. धाराशिव) यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पूजा साहित्य खरेदी करून सायंकाळी एस. टी. स्टँडवर आल्या, ५ वाजता सुटणारी बीड गाडी लागल्यानंतर फिर्यादी हे नातुबरोबर गाडीमध्ये चढत असताना पाठीमागुन एका महीलेने जोराचा धक्का दिला. त्यामुळे तोल सांभाळुन पिशवी सांभाळत असताना त्या महिलेने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याच्या मण्याची माळ जबरदस्तीने ओढुन खेचली दरम्यान तिच्या सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने धक्का दिला. तिसन्या महिलेने फिर्यादीला वरती ढकलले.

पाठीमागील हिहलेने गळ्यातील सोन्याच्या मण्याची माळ खेचली. यामध्ये सोन्याचे ६० ते ६५ मणी व दोन मोठे मणी व काळे मणी असलेली माळ चोरून नेली. त्याच दरम्यान बसस्थानकावर केशरबाई जालिंदर लोंढे (वय ६० रा. मळेगाव, ता. बार्शी) यांचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्रही अज्ञात महिलांनी जबरीने चोरून घेऊन गेले. तिसऱ्या घटनेत मायादेवी पाटील (वय ५०) रा. गोलेगाव पो. पारडी, ता. वाशी या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सोमवार २५ रोजी सायंकाळी बार्शी-परंडा बसमध्ये चढत असताना अज्ञात दोन महिलांनी त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल असलेले गंठण तसेच आणखी एक महिला सुनीता बबनराव आगळे (रा. आगळगाव) या महिलेचे १८ ग्रॅम वजनाचे गंठण तोडून नेले आहे. एकाच दिवशी बार्शी बस स्थानकावर चार चोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपास हवालदार रेवनाथ भोंग हे करत आहेत.बार्शी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावर एकाच दिवशी चार महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेले आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR