24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeचिमुरड्यांच्या ‘स्क्रीन टाईम’वर स्विडनमध्ये बंदी!

चिमुरड्यांच्या ‘स्क्रीन टाईम’वर स्विडनमध्ये बंदी!

स्टॉकहोम : वृत्तसंस्था
स्वीडनने २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर स्क्रीन टाईमकरता पूर्णपणे बंद घातली आहे. स्क्रीन टाईममुळे मुलांवर प्रतिकूल प्रभाव पडत होता. अधिक screen time स्क्रीन टाईममुळे मुले आणि किशोरवयीनांमध्ये स्लीप डिसऑर्डर, एंक्झाइटी, डिप्रेशन आणि ऑटिजम होत असल्याचे अनेक अध्ययनात दिसून आले आहे. तसेच मुलांच्या शारीरिक हालचालींमध्ये घट झाली आहे. मुलांना टीव्ही आणि मोबाइल समवेत कुठल्याही स्क्रीनच्या वापराची अनुमती दिली जाऊ नये असे स्वीडन सरकारने स्पष्ट केले आहे.

अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यासारख्या देशांनी यापूर्वीच मुलांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. फ्रान्समध्ये तर ३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्क्रीन वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची योजना आहे.

दीर्घकाळापर्यंत स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर डिजिटल तणाव, ड्राय आय डिसिज, मायोपिया म्हणजेच निकट दृष्टीदोषाची समस्या निर्माण होऊ शकते. चीन आणि कोरिया यासारख्या देशांमध्ये ५० टक्के मुलांमध्ये मायोपिया होत आहे. तर अधिक स्क्रीन टाइममुळे ऑटिजम, स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा धोका आहे. २०२२ मध्ये जपानमध्ये झालेल्या एका अध्ययनात एक तासापेक्षा कमी स्क्रीन टाइममुळे तीन वर्षांच्या वयात एएसडीचा धोका ३८ टक्के जोखिमीशी निगडित होता. तर दोन तासांपेक्षा अधिक स्क्रीन टाइमसोबत ही जोखीम तीनपट अधिक झाली होती. म्हणजेच जितका अधिक स्क्रीन टाइम तितका एएसडीचा धोका अधिक.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR