लातूर : प्रतिनिधी
पोलीस ठाणे अहमदपूर, चाकूर व उदगीर ग्रामीण येथे घडलेल्या एम.एस.ई.बी. लाईटची अॅल्युमिनियम वायर चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार हे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी त्याच्या इतर साथीदारासह सदर गुन्हे केले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक ८ मार्च रोजी ११ वाजण्याच्या सुमारास सदर पथक तात्काळ नांदेड जिल्ह्यातील माळटेकडी तालुका नांदेड परिसरामध्ये पोचून दोन आरोपींना त्याच्या राहत्या ठिकाणाहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांनी अल्युमिनियम चोरीचे केलेले तीन गुन्हे उघड झाली असून या गुन्ह्यातील ६ लाख ९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्याचे नाव संदीप लक्ष्मण गायकवाड, वय २५ वर्ष, राहणार पुणेगाव तालुका जिल्हा नांदेड. व शेषराव शामराव वाघमारे, वय २६ वर्ष, राहणार पांगरी तामसा तालुका हादगाव जिल्हा नांदेड सध्या राहणार पुणेगाव तालुका जिल्हा नांदेड. असे असल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भाने विचारपूस केली असता त्याने सांगितले कि, काही महिन्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्याच्या इतर साथीदारा नामे सचिन आनंदराव कांबळे, राहणार माळटेकडी तालुका नांदेड सध्या रा. पंचशील नगर पूर्णा जिल्हा परभणी.(फरार) बादल अशोक गायकवाड, रा. रमाबाई आंबेडकर चौक अंबड जिल्हा जालना.(फरार) आदिनाथ मनोहर मोरे, रा. सुमठाणा तालुका वसमत जिल्हा हिंगोली.(फरार) यांनी मिळून एम.एस.ई.बी. लाईटची अॅल्युमिनियम वायर चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.
तसेच चोरी केलेल्या गुन्ह्यातील लपवून ठेवलेले कट केलेले अॅल्युमिनियम वायर काढून दिले. त्याची पाहणी केली असता सदरचे वायर पोलीस ठाणे अहमदपूर,चाकूर व उदगीर ग्रामीण हद्दीतून चोरलेले असल्याचे निष्पन्न झाले असून सदर पोलीस स्टेशनला अॅल्युमिनियम चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अनुक्रमांक १ ते २ आरोपींना त्यांनी चोरी केलेल्या २ लाख ८४ हजार ७५८ रुपयाच्या अॅल्युमिनियमच्या वायरचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असे एकूण ६ लाख ९ हजार ७५८ रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. आरोपी अनुक्रमांक ३ ते ५ हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ताब्यातील आरोपींना पुढील कार्यवाहीस्तव पोलीस ठाणे अहमदपूरच्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार , योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, चालक पोलिस अमलदार चंद्रकांत केंद्रे, प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.