15.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चिंतन-मंथन

छ. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चिंतन-मंथन

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मराठवाड्यात दमदार कामगिरी दाखवली. आठपैकी सात लोकसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीचे शिलेदार निवडून आले. तर उद्धव सेनेला छत्रपती संभाजीनगरची जागा खात्रीदायक वाटत होती, ती मात्र हातची गेली. या पराभवाचे चिंतन-मंथन झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र पालटण्याचा प्रयत्न होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेत ठाकरे गटाचा पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाकडून संभाजीनगर येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे, नेते अंबादास दानवे, संभाजीनगरचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर उपस्थित होते.
शिवसेना पक्षाला मानणारे मतदान आपल्याला लोकसभेत झाले इतर कोणते मतदान झाले नाही, मुस्लिम, दलित मतदान संभाजीनगर लोकसभेत झाले नाही. येणा-या विधानसभेत बाकी मतदान घ्या आणि विधानसभेत करिष्मा करून दाखवा असे आवाहन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी इच्छुक उमेदवारांना केले.

जे झालं ते सोडून जिथं जिथं कमी राहिलो, ज्या कमतरता, आपला सर्कल प्रमुख गावोगांव गेला का? जी तुटकी फुटकी साधनं होती त्यातून प्रचार आपण केला. केवळ आपल्या पक्षाला मानणारे मतदान आपल्याला पडलेलं आहे, शिवसेनेचे बेसिक मतदान पडले आहे, आपण म्हणतो मुसलमान, दलित मी कोणत्या जातीपातीवर बोलणार नाही. पक्षाला मानणारे बेसिक मतदान झाले आहे. आपला लोकसभेत पराभव झाला पण आपला विश्वास मजबूत ठेवण्याची आवश्यकता आहे. या मोठ्या पराभवातून फिनिक्ससारखी भरारी घ्यावी लागेल असे अंबादास दानवे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR