22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरछ. संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर

छ. संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर

सोलापूर :संभाजी आरमारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिराममध्ये ५८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तींस विधीज्ञ महेश जगताप, उद्योजक अजय राऊत व संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा व्हावा या हेतूने संभाजी आरमार वर्षातून चार वेळा शिबिरांचे आयोजन करते.

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर घेतली जातात. याप्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी राष्ट्र, धर्मासाठी अस वेदना सहन करत दिलेल्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी रक्तदानाच्या माध्यमातून करत राहू असे प्रतिपादन केले या शिबिरामध्ये संकलित झालेले रक्त छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर यांना देण्यात आले.

यावेळी कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, शहरप्रमुख सागर ढगे, जिल्हा संघटक अमित कदम, उपजिल्हाप्रमुख प्रमोद जगताप, राजेश पाटील, उपशहरप्रमुख राज जगताप, रेवणसिद्ध कोळी, प्रवक्ता मनीष काळे, दिव्यांग संघटनेचे शहरप्रमुख वासुदेव होनकोंबडे, कार्यालयीन प्रमुख सुधाकर करणकोट, प्रभागप्रमुख मल्लिकार्जुन पोतदार, राजू रच्चा, सागर दासी, प्रवीण मोरे इ.सह रक्तदाते राजेश मन्सावाले, राजू अंबेवाले, गणेश मन्सावाले, सचिन मन्सावाले, लक्ष्मण बाडीवाले, शुभम लंबूवाले, सचिन गायकवाड, पिंटूऔरंगे, राजशेखर यनगंदूल, रामू जल्ला, सिद्राम मग्रूमखाने, स्वप्नील इराबत्ती, सागर यंगल, मनोज ढगे आदीजण उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR