18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रछ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड

छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदद्वारा आयोजित १६ डिसेंबर २०२४ रोजी मौलाना अबुल कलाम सभागृह कोरेगाव पार्क, पुणे येथे होणा-या १६व्या छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ.श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलूंचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या संमेलनाचे आयोजन दरवर्षी विविध ठिकाणी करण्यात येते. सबनीस यांनी एकूण ४५ हून अधिक ग्रंथांचे विपुल लेखन केले असून त्यामध्ये सामाजिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, ग्रामीण, प्रबोधनात्मक, चिंतनात्मक, धर्मशास्त्र, जीवनशास्त्र, आदी विषयांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह त्यांनी आजवर ४० हून अधिक विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या अमोघ वाणीतून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध तर केलेच त्याबरोबर वास्तवाचे नवे आत्मभानही दिले. राज्य शासनाच्या पुरस्कारांसह आजवर शेकडो पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ग्रंथपूजनाने या साहित्य संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ, परिसंवाद, कविसंमेलन, चर्चासत्र व संमेलनाचा समारोप असे स्वरूप असणार आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR