17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeजमशेदपूर येथून उडालेले विमान काही मिनिटात गायब

जमशेदपूर येथून उडालेले विमान काही मिनिटात गायब

जमशेदपूर : वृत्तसंस्था
उड्डाण केल्यानंतर काही काळानंतर बेपत्ता झालेल्या मलेशियाच्या एमएच ३७० विमानाचं गुढ १० वर्षांनंतरही उकललेलं नाही. अशीच घटना झारखंडमध्ये घडली आहे. जमशेदपूरहून उड्डाण केल्यानंतर संपर्क तुटलेले ट्रेनी विमान बेपत्ता झाले आहे. सोनारी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच ते बेपत्ता झाले.

या विमानाचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. एनडीआरएफकडून सारायकेला येथील चांडिल डॅममध्ये एनडीआरएफच्या टीमकडून विमानाचा शोध घेतला आहे. मात्र विमानाबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.

एका स्थानिक तरुणाने दिलेल्या माहितीनुसार त्याने एका छोट्या विमानाला चांडिल डॅममध्ये कोसळताना पाहिले होते. दरम्यान, या विमानामध्ये असलेले कॅप्टन जीत शत्रू आणि ट्रेनी कॅप्टन सुब्रतो दीप यांच्याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. एनडीआरएफचं पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक पातळीवरच चांडिल डॅममध्ये शोधमोहीम राबवण्यात येत होती. बुधवारी दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र यादरम्यान, विमान आणि विमानातील वैमानिकांबाबत काहीच माहिती मिळाली नाही.

अल्केमिस्ट एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या या विमानाने सकाळी ११ वाजता सोनारी विमानतळावरून उड्डाण केलं होतं. त्यानंतर ५० मिनिटांनंतर या विमानाचा एटीसी असलेला संपर्क तुटून ते बेपत्ता झाले होते. एव्हिएशनच्या टीमसह जमशेदपूर आणि सारायकेला येथील प्रशासन आणि वनविभागाच्या कर्मचा-यांकडून या विमानाचा शोध घेण्यात येत होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR