27.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रजयंत पाटील भाजपात येणार?

जयंत पाटील भाजपात येणार?

संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मागच्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. ते लवकरच भाजपात जाणार असल्याचे वारंवार बोलले जाते. आता पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या नाराजीवर भाष्य करण्यात आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर कोणीही कुठेही जाऊ शकतं. आमच्या गटात किती जण येतात तेही लवकरच कळेल. जयंत पाटील हे शरद पवार गटात अस्वस्थ आहेत. रोहित पवार वारंवार त्यांचा अपमान करतात. कदाचित ते भाजपच्या वाटेवर आहेत, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. त्यांच्या या दौ-यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आंदोलन केले. त्यांनी मोदींच्या दौ-याला विरोध केला. अंबादास दानवे हे कुठे होते, मला माहीत नाही. त्यांनी विरोध केला हे मला माहीत नाही.

दानवे यांना काय करावे हे सुधरत नाही ते आधी नौटंकी करण्याच्या मार्गावर आहेत. विरोधाला विरोध म्हणून हा छोटासा त्यांनी प्रयोग केला आहे. नेमके यांना करायचे काय हे समजू द्या. ही नौटंकीच आहे दुसरा शब्द नाही. दानवे यांच्यावर कमेंट करणं म्हणजे त्यांना वाढवा देणं होय, असे संजय शिरसाट म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR