27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरजळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस

जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस

जळकोट : ओमकार सोनटक्के
तालुक्यात संपूर्ण श्रावण महिन्यात पावसाने दमदार बॅंिटग केली आहे. जून व जुलै महिन्यात लातूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद जळकोट मध्ये होती परंतु आज रविवारी मात्र जळकोट तालुक्यात एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्या नोंदीवरून जळकोट तालुक्यात पावसाने मोठा कहर केल्याचे दिसून येत आहे .

दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. तालुक्यातील नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहेत. अनेक छोट्या नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांचाही संपर्क तुटला आहे ,जळकोट तालुक्यात सर्वात मोठी नदी असलेल्या तिरू नदीलाही पहिल्यांदाच मोठा पूर आला आहे . अनेक कोल्हापूरी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तिरू नदीला पूर आल्यामुळे अतनूर ते घोणसी हा संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे. यापूर्वीचा चांगला पुल पाडून पुन्हा या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी पर्यायी पूल उभारण्यात आला आहे परंतु नदीला मोठा पूर आल्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे

तालुक्यातील शेत शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत. यापूर्वीच तालुक्यात शेत अधिक पाऊस झाला आहे यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता पाऊस उघडेल अशी अपेक्षा शेतक-यांची होती परंतु पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅंिटग सुरू केली आहे. सोयाबीनच्या शेंगा भरण्यासाठी जमिनीला ताण आवश्यक असतो परंतु गत एक महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे यामुळे जमिनीत मोठा ओलावा असल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरलेल्या नाहीत. पूर्णपणे सोयाबीनच्या शेंगा रिकाम्याच राहत आहेत यामुळे शेतक-यांंना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. यासोबतच अति पावसामुळे शेतक-यांंचा कापूसीर उन्मळून जात आहे. कापसाचे बोंडे नासून जात आहेत. यापूर्वीच शेतक-याच्या मुगाचे मोठे नुकसान झाले होते आता उरलेसुरले उडीदही हातून गेले आहे. प्रचंड पावसामुळे शेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

तरुण शेतकरी गेला वाहून

जळकोट तालुक्यातील ढोर सांगवी येथील युवा शेतकरी नरेश अशोक पाटील (वय २८) हे पोळ्याच्या निमित्ताने आपल्या शेतीजवळील नदीत बैलाला धूत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते बैलासकट वाहून गेले. बैल मात्र सुखरूप बाहेर निघाले ही घटना दुपारी १ च्या सुमारास घडली. त्यांचा शोध गावकरी दुपारी २ वाजल्यापासून घेत होते मात्र नरेशचा मृतदेह आढळून आला नाही .

१ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. पोळ्याच्या एक दिवस अगोदर खांड मळण्या दिवशी शेतकरी नरेश अशोक पाटील हे बैल्यांना पोहणी घालत पाण्याचा प्रवाह वाढला. यात नरेश पाटील हे पाण्याबरोबर वाहून गेले. बैल मात्र पोहून बाहेर आले. नरेश पाटील यांना पोहता येत नसल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे वाहून गेले. असा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. सोनवळा येथील साठवण तलावामध्ये शोध घेतला जात आहे .

शेतकरी नरेश पाटील हे बैल धुण्यासाठी जातो म्हणून सकाळी शेतीकडे गेले होते पंरतू दुपारी दोन पर्यंत ते घरी आलेच नाहीत त्यांचा फोन देखील लागत नव्हता यावेळी घरची मंडळी शेतीकडे गेली असता शेतामध्ये नदीच्या दुस-या बाजूला बैल दिसून आले मात्र नरेश काही दिसून आले नाहीत. गावातील जवळपास १०० नागरिक नदीच्या दोन्ही बाजूला नरेश पाटलांचा शोध घेत होते परंतू रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. नरेश हा त्यांच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे . दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मंडळ अधिकारी कमलाकर पन्हाळे यांनी भेट दिली. रात्री अंधार झाल्यामुळे तसेच मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ग्रामस्थांनाही शोध मोहीम थांबवावी लागली .

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR