28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात ६७६ शुभ्र शिधापत्रिकाधारक

जळकोट तालुक्यात ६७६ शुभ्र शिधापत्रिकाधारक

जळकोट : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्डधारकांनाही महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. जळकोट तालुक्यातील तब्बल ६७६ शुभ्र शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. या कार्डधारकांमध्ये जवळपास ३००० व्यक्ती असून या सर्व व्यक्तींना या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे .
    शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे शुभ्र शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश दि १८ जून रोजी काढण्यात आले आहेत. यापूर्वी पिवळी शिधापत्रिकाधारक तसेच केसरी शिधापत्रिकाधारक सर्व व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात येत होता. जळकोट येथील तहसील कार्यालयामध्ये शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यांच्या शुभ्र शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्नित झालेल्या नाहीत,
महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याकरता तसेच आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याकरिता सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाची संलग्न करणे आवश्यक असून शुभ्र शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका आधार क्रमांकशी संलग्नित करावी असे आवाहन तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले आहे. जळकोट येथील पुरवठा विभागामध्ये माहिती जमा करण्याचे काम सुरू झाले असून या कामी अव्वल कारकून घाटे , लिपिक गाजरे आर . व्ही , कर्मचारी कोंडीबा गवळे, माधव सातापुरे  यांच्यामार्फत सुरू झाले आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR