25.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeराष्ट्रीयभर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

भर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे अध्यक्षपद कोणाकडे असणार यावरून सुरु असलेल्या चर्चांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशन सुरु करण्यासाठी भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची शुक्रवार दि. २० जून रोजी हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कटकचे भाजप खासदार भर्तृहरी महताब हे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष असणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ही माहिती दिली. महताब हे लोकसभा अध्यक्ष निवडीपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे रिजीजू म्हणाले. सदस्यांना शपथ घेण्याच्या कामी हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी घटनेच्या कलम ९९ अन्वये सुरेश कोडीकुन्नील, थालिकोट्टई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR