Homeलातूरजळकोट येथे पहिल्या टप्प्यात ४० जणांना देण्यात आले प्रशिक्षण

जळकोट येथे पहिल्या टप्प्यात ४० जणांना देण्यात आले प्रशिक्षण

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तहसील कार्यालयाच्या वतीने जळकोट येथे तालुक्यातील १३५ प्रगणक व २३ पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. पहिल्या बॅचमधील ४० जणांचे प्रशिक्षण जळकोट येथील महात्मा फुले शैक्षणिक संकुलामध्ये झाले .
जळकोट तहसीलचे पर्यवेक्षणाधिन तहसीलदार पाटील यांनी उपस्थित सर्व प्रगनक तसेच पर्यवेक्षकांना जनगणना करताना घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन केले. जनगणना करताना कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. ऑनलाईन माहिती अपलोड करताना चुकीची माहिती अपलोड होणार नाही याचीही काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी उपस्थित कर्मचा-यांना दिल्या . जळकोट तालुक्यासाठी जनगणना या कामासाठी १५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून १३५ प्रगणक, २३ पर्यवेक्षक आहेत. या कर्मचा-यांना जनगणनेबाबत माहिती प्रशिक्षक व्यंकट आंदे, मारोती आगलावे हे देत आहेत. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जनगणना विभागाच्या नायब तहसीलदार मुळजकर, विभागात नियुक्त महसूल सहाय्यक भावना भेंडेकर, रमेश रुदेवाड हे परिश्रम घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR