19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeपरभणीजिल्हाधिका-यांनी केली १२वी परीक्षा केंद्राची पाहणी

जिल्हाधिका-यांनी केली १२वी परीक्षा केंद्राची पाहणी

परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत होणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२वी परीक्षेला आज बुधवार, दि.२१ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील ६९ केंद्रावर २६ हजार ६०८ विद्यार्थी १२वी परीक्षा देणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सकाळी शहरातील १२वी परीक्षा केंद्रास अचानक भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेचा भंग होऊ नये याची दक्षता घेत पाहणी केली.

परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालय येथील १२वी परीक्षा केंद्रास अचानक भेट देवून जिल्हाधिकारी  गावडे यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष वर्ग भेटी देत पाहणी केली. तसेच केंद्र प्रमुखांकडून परीक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. कॉपीला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना, परीक्षा व्यवस्थेचे नियोजन व संनियंत्रण, परीक्षार्थींसाठी उपलब्ध केलेल्या सुविधा, आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था आदींचा आढावा जिल्हाधिकारी यांनी यावेळी घेतला.

जिल्ह्यातील ६९ परीक्षा केंद्रावर सुमारे २६ हजार ६०८ परिक्षार्थी १२वी ची परीक्षा देणार आहेत. ८ परिरक्षक केंद्रामार्फत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कॉपीला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असुन, यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी  रघुनाथ गावडे यांनी यावेळी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR