जळकोट : प्रतिनिधी
लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी जळकोट तालुक्यातील गव्हाण येथील रहिवासी असलेल्या तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी अध्यक्षा श्रीमती शीलाताई पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अनेक दिवसानंतर जळकोट तालुक्याला लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मोठे पद मिळालेले आहे .
माजी मंत्री दिलीपराव देशमुख, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालखे, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख,आमदार धीरज विलासराव देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशेल उटगे , लातूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, जळकोट तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथ किडे यांनी नूतन महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील यांना शुभेच्छा दिल्या.तसेच याप्रसंगी नूतन जिल्हाध्यक्ष शिलाताई पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले .
जळकोट तालुक्यातील गव्हाण येथील रहिवासी असलेल्या शीलाताई पाटील यांनी यापूर्वी काँग्रेस कमिटीमध्ये अनेक पदे भूषवली आहेत. जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका तथा अध्यक्ष, यासोबत अनेक पदे भूषवली आहेत. शीलाताई पाटील या काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. शीलाताई पाटील यांची महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जळकोट तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
राज्याचे माजी क्रीडा तथा युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालखे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असे श्रीमती शिलाताई पाटील यांनी सांगितले.