परभणी/प्रतिनिधी
जिल्ह्यात सोमवारी (दि२) सकाळपर्यंत संपलेल्या मागील २४ तासात सरासरी १३८.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, पुर्णा वगळता सर्वच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाथरी, मानवत व सेली तालुक्यात अनुक्रमे२२९.५ , १९७.८ व १८१.२ मिमी इतक्या मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.
परभणी १०२.७, गंगाखेड १००.८, जिंतूर १५८.१, पुर्णा ७२.९, पालम १००.४, सोनपेठ तालुक्यात १४२.२ मिनी पावसाची नोंद झाली आहे.