लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात ११ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये सुरू झाला होता. यावर्षी जिल्हयात मुबलक प्रमाणात ऊस गाळपास उपलब्ध नसल्याने ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्यात आला आहे. सध्या तशा सुचना साखर कारखान्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. जिल्हयात ११ साखर कारखान्यांनी २६ लाख ६२ हजार ६६३ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करत २४ लाख २३ हजार ५०५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
जिल्हयात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचाही विषय गंभीर झाला होता. अशा परिस्थितीत अनेक शेतक-यांनी ऊसाचे बागायत क्षेत्र मोडीत काढले. ज्या शेतक-यांकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध होते, अशा शेतक-यांनी ठिबक सिंचनाच्या सहाय्याने ऊसाचे पिक जोपासले. या उपलब्ध ऊसाचे नोव्हेंबर पासून टप्या-टप्याने ११ साखर कारखान्याकडून गाळप सुरू झाले. सध्या ११ पैकी १० साखर कारखान्यांच्याकडून ऊस गाळप होत आसून त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस जवळपास संपत आला आहे. तर शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारीचे गाळप बंद झाले आहे. ………