27.1 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeराष्ट्रीयजेएनयूमध्ये शिवरायांचा इतिहास शिकवला जाणार

जेएनयूमध्ये शिवरायांचा इतिहास शिकवला जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी याबाबत माहिती दिली.

जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या नावाने सुरू होणा-या या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे. या कोर्समध्ये इतर विषयांसह भारतीय सामरिक विचार, मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध शिकविण्यावर भर दिला जाणार आहे. जेएनयूमध्ये मराठा ग्रँड स्ट्रॅटेजी, गुरिल्ला डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या काळातील स्टेटक्राफ्ट आणि त्यानंतर स्टेटक्राफ्ट इत्यादी सहा अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रस्ताव आहे. या कोर्ससाठी पहिल्या ५ वर्षांत सुमारे १५ ते ३५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो.

जुलै २०२५ पासून डिप्लोमा, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहे. जेएनयूमधील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्राचार्य अमिताभ मट्टू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, केंद्र सुरू करण्याची कल्पना कुलगुरू आणि काही प्राध्यापकांकडून आली. महाराष्ट्र सरकारलाही छत्रपतींच्या विचारांचे स्मरण करायचे होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची सागरी रणनीती यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे.
शाळेचा आदेश सुरक्षा आणि धोरण शिकवणे आहे. आपण अनेक रशियन आणि चिनी विचारवंतांबद्दल शिकवतो. कौटिल्य आणि चाणक्य यांच्याबद्दलही शिकवतो. आम्हाला शिवाजी महाराज आणि त्यांचे सुप्रसिद्ध धोरणात्मक विचारही जोडायचे होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा होईल, असंही ते म्हणाले. ‘‘देशाची सुरक्षा सुनिश्चित करणे, भूतकाळ समजून घेण्यासाठी आणि आधुनिक भारताची मजबूत आणि सर्वसमावेशक ओळख निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक धड्यांमधून शिकणे महत्त्वाचे ठरते, असे प्रस्ताव नोटमध्ये म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR