लेकीच्या शाळेत ऐश्वर्या, अभिषेक बच्चनचा धमाकेदार डान्स

मुंबई : वृत्तसंस्था
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अलीकडेच जोरदार रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्या एका व्हायरल व्हीडीओमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम मिळणार असे दिसत आहे. कारण या व्हीडीओमध्ये अभिषेक पत्नी ऐश्वर्यासोबत मस्त डान्स करताना दिसत आहे.

दरम्यान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन लवकरच घटस्फोट घेणार आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. अनेकदा ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत एकटीच दिसली. पण आता या सर्व चर्चांवर पडदा पडणार असे दिसून येत आहे. कारण या पती-पत्नीचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्यामुळे आता चाहत्यांचा संभ्रम दूर होणार असे दिसत आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आता काही नवीन नाहीत. ब-याच महिन्यांपासून त्यांच्या कौटुंबिक वादाबद्दल आणि त्याच्या घटस्फोटाबद्दल ब-याच आणि वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. पण काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेकचे असे काही फोटो आणि व्हीडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार असे दिसत आहे.

या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान लेक आराध्याच्या शाळेतील एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हीडीओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा डान्स पाहायला मिळत आहे. शाळेतील मुलांसोबत ऐश्वर्या आणि अभिषेक दोघे डान्स करत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नुकताच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिले होते. आराध्याची अ‍ॅक्टिंग पाहायला ऐश्वर्या, अभिषेक तसेच अमिताभ बच्चनसुद्धा पोहोचले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52
Video thumbnail
Latur|गणरायाच्या आरतीने एकमत कार्यालय भक्तिमय | धनंजय देशमुख उपस्थित
02:21
Video thumbnail
Nanded|झेंडावंदनावरून नांदेडमध्ये वाद! पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा
03:17
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेटचा दणका! 15 दिवसांत 12,561 जणांवर कारवाई
03:13
Video thumbnail
Latur|झाडात अवतरले गणराय! ‘ग्रीन लातूर’चा अनोखा गणेशोत्सव
03:29
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
04:28
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये सोयाबीन पिकावर संकट!दुष्काळ जाहीर करा,शेतकऱ्यांची मागणी
01:53
Video thumbnail
Latur|जगायला बळ द्या, अन्यथा मारून टाका!” शिरूर अनंतपाळमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश
03:37
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
09:37
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36

Latest news