भोकर : प्रतिनिधी
भोकर उमरी बायपास चौकात भोकर येथील दोन तरुण ३१ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास पल्सर दुचाकीने उमरीकडे जात होते. डस्टने भरलेल्या टिप्परने दुचाकीस उडविले, त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
भोकरपासून जवळच असलेल्या उमरी बायपास मार्गावर भोकर येथील रहिवासी हे दोघे पल्सर कंपनीची दुचाकी क्र. एम.एच. २६ सीजे ५४९३ ने ३१ मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास भोकरकडून उमरीकडे जात असताना डस्टने भरलेल्या अजय कंस्ट्रक्शन कंपनीचे टिप्पर क्र. एम.एच. २६ बीई ९९०७ या वाहनाच्या हरी बालाजी साडेवाड वय २६ आणि राहुल वाघमारे २७ हे दोघे मागच्या टायरमध्ये चिरडले. दरम्यान सदर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयांत पाठविण्यात आले असून भोकर पोलिसांकडून पुढील कारवाईस्तव टिप्पर व पल्सर दुचाकी दोन्ही वाहन जप्त केले आहे. टिप्पर चालकांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.