35.2 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeमुख्य बातम्याटेंडर प्रक्रियेतील दोषांमुळे सिंचन घोटाळा!

टेंडर प्रक्रियेतील दोषांमुळे सिंचन घोटाळा!

अजित पवार, तटकरेंचा थेट सहभाग आढळला नाही : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मागील दशकभरात कथित सिंचन घोटाळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरून तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. मात्र हेच अजित पवार आता भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने स्ािंचन घोटाळ्याच्या आरोपांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तेव्हा मी केलेले आरोप खरे ठरल्याचा दावा केला आहे.

२०१४ मध्ये अजित पवारांवर स्ािंचन घोटाळ्याचे आरोप करणे ही एक चूक होती का? असा प्रश्न द इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, मी केलेले सर्व आरोप नंतर खरे ठरले आहेत. मी जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यावरून कारवाई करण्यात आली. त्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करून चार्जशीटही दाखल करण्यात आली. काही लोक दोषी ठरले आहेत. यामुळे स्ािंचन खात्यातील काही नियमांची दुरूस्तीही करण्यात आली, याचे मला समाधान आहे. या खात्यात होणारा भ्रष्टाचार नंतर बंद झाला आणि टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणली गेली, अशा शब्दांत फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.

सिंचन घोटाळ्याविषयी पुढे बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, या प्रकरणात आम्ही अजित पवार यांच्यावर आरोप केले, कारण ते या खात्याचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांना जबाबदार धरणे स्वाभाविक होते. मागच्या १३-१४ वर्षांमध्ये यंत्रणांनी सर्व बाबींचा तपास केला आहे. मात्र एकाही चार्जशीटमध्ये यंत्रणांना या प्रकरणात अजित पवारांचा थेट सहभाग आढळून आला नाही. त्यामुळे आम्हाला यंत्रणांचा तपास मान्य करावा लागला.

कथित स्ािंचन घोटाळ्यात अजित पवारांचा एकाही प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. कोकण विभागातील प्रकरणांमध्ये आम्ही अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या भूमिकांबाबत अजूनही चौकशी करत असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले होते. मात्र नंतर या तपासातही अजित पवार आणि तटकरेंचा घोटाळ्यातील सहभाग आढळून आला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR