सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे १८०० मीटरचे काम टेंभुर्णी बायपासजवळ थांबले आहे. १३ शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी झाली आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी १ कोटीचा निधी तयार ठेवला आहे. मोजणीचे काम होऊनही अद्याप भूसंपादन विभागाने मोबदला देण्या याबाबतचा आदेश काढला नाही, महापालिकेच्या भूसंपादन विभागाच्या एक कोटी निधीच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे टेंभुर्णीजवळ समांतरचे काम रखडले आहे.
शहरात सध्या पाच दिवसांआड तर हद्दवाढ भागात सहा दिवसांआड पाणीपुरवठा आहे. त्यामध्ये पालिकेच्या पंपगृहातील बिघाड, वीजपुरवठा खंडित होणे, पाणी गळती अशा कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होते. या आठवड्यात अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत. परिणामी पाणीपुरवठा विभागास एक रोटेशन पाणी पुरवठा पुढे नेण्याची नामुष्की पाणी पुरवठा विभागावर आली आहे.
शहराला शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे. वर्ष झाले तरी या योजनेचे काम चालूच आहे. अद्याप
पूर्ण झाले नाही. काम अंतिम टप्प्यात आले आहे. ९५ टक्के काम झाले आहे. डिसेंबरअखेर पाईप लाईन योजना पूर्ण करून नवीन वर्षात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची घोषणा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आली. मात्र समांतर जलवाहिनीचे काम तीन ठिकाणी रखडले आहे.
उजनी धरणाजवळील काम पोलिस बंदोबस्तात करण्यात आले. मात्र टेंभुर्णी गावातून समांतर जलवाहिनी टाकण्यास गावातील राजकीय कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे बायपासच्या बाजूने जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी १३ शेतकऱ्यांच्या जागेचे भुसंपादन करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्यांना पाच ते सहा लाख या प्रमाणे १ कोटी रुपये महापालिकेस लागणार आहे. हे भुसंपादनाचे पैसे तयार आहे. मात्र भूसंपादन विभागाने मोजणी केलेल्या जमिनीचा मोबदाला बाधित समांतर जलवाहिनीचे काम डिसेंबरअखेर पुर्ण करून नवी वर्षात शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची घोषणा केली होती. मात्र पाईप लाईनचे रखडले काम, नवीन पंपगृह निविदा, जॅकवेल अभावी नवीन वर्षात एक दिवसाड पाणी पुरवठा मृगजळ ठरण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश भूसंपादन विभागाने काढले नाहीत. त्यामुळे भूसंपादनाचे पैसे तयार असताना देखील काम चालू करता येत नाही महापालिकेस भूसंपादन विभागाच्या आदेशाची प्रतीक्षा महापालिकेस आहे.
समांतर जलवाहिनीची चाचणी जानेवारी महिन्यात घेण्याचे नियोजन असून भूसंपादनाचे मोबदला देण्याचे आदेश दोन दिवसात मिळण्याची शक्यता आहे. आदेश मिळताच मोबदला बाधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले जातील काम चालू केले जाईल.असे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगीतले.