30.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeराष्ट्रीयटॉप कमांडरसह १८ नक्षलवादी ठार

टॉप कमांडरसह १८ नक्षलवादी ठार

मतदानापूर्वी मोठी चकमक; ३ जवान जखमी

बस्तर : लोकसभा निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या १९ एप्रिल रोजी देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अशातच छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कांकेरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन जवान जखमी झाले, तर १८ नक्षलवादी ठार झाले आहेत.

एसपी कल्याण अलीसेला यांनी चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली आहे. नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर शंकर रावही मारला गेल्याचे त्यांनी सांगितले. शंकर राव याच्यावर २५ लाखांचा इनाम होता. घटनास्थळावरुन ७ एके ४७ रायफल, १ इन्सास रायफल आणि ३ एलएमजीदेखील जप्त करण्यात आले. जखमी जवानांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

बीएसएफची नक्षलविरोधी कारवाई
वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले की, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना छोटे बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात गोळीबार सुरू झाला. गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, तर अनेक नक्षलवादी ठार झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR