34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरस्टेट बँकेकडून जिल्हा बँकेला मागणीनुसार रोकड पुरवठा होत नसल्याने रोकडचा तुटवडा

स्टेट बँकेकडून जिल्हा बँकेला मागणीनुसार रोकड पुरवठा होत नसल्याने रोकडचा तुटवडा

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा बँकेमार्फत माध्यमिक शिक्षकांचे पगार, शेतक-यांची ऊस बिले, निराधार वाटप, पेन्शनर्स पगार, पीएम किसान, अनुदान वाटप, पीकविमा इत्यादीचे वाटप केले जाते. बँकेस रोकड पुरवठा हा चेस्ट करन्सीमार्फत केला जातो. आपल्या जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडिया(रइक) इतर बँकांना रोकड पुरवठा करते. जिल्हा बँकेस दैनंदिन व्यवहारासाठी दररोज १५ कोटी रुपये रकमेची आवश्यकता असते. परंतु स्टेट बँकेमार्फत मागणीनुसार रोकड पुरवठा केला जात नाही. जिल्हा बँक इतर बँकांकडून स्वखर्चाने रोकड जमा करते व ग्राहकांच्या गरजा भागविते.
माहे एप्रिल २०२४ मध्ये शिक्षकांचे पगार, निराधार, पेन्शनर्स पगार, शेतक-यांचे ऊसबिल हे एकाचवेळी जमा झाल्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात रोकड रकमेची मागणी वाढली असुन मागील कांही दिवसापासून दैनिक रोकड मागणी वाढून रुपये २५ कोटीवर गेलेली आहे. अचानक रोकड मागणीत झालेली वाढ व स्टेट बँकेकडून होत नसलेला पुरवठा यामुळे कांही प्रमाणात सध्या रोकड टंचाई भासत आहे. एका वृत्तपत्रात जिल्हा बँकेत पैशाचा तुटवडा, अशी बातमी प्रकाशित झाली होती  स्टेट बँक करन्सी कडून रोकड पुरवठा कमी होत असल्याने रोकड तुटवडा  निर्माण झाला  आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR