19.2 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रटोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई

टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई

मुंबई : मुंबईमधील दादर परिसरात टोरेस नावाच्या कंपनीने कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकारानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आता या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) एन्ट्री केली आहे. आज ईडीने मोठी कारवाई करत मुंबई आणि जयपूरमधील तब्बल १० ठिकाणी छापेमारी केली आहे.

टोरेस कंपनीने तब्बल १००० कोटींची ही फसवणूक केल्याची माहिती सांगितली जाते. यामध्ये एक लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात कंपनीशी निगडीत असणा-या तिघा जणांना पोलिसांनी अटक केले असून ते कोठडीत आहेत. मुंबई आणि आसपासच्या एक लाखाहून अधिक गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन या टोरेस कंपनीने दिले होते.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता ईडीने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत या घोटाळ्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. आज अंमलबजावणी संचालनालयाने (२३ जानेवारी) टोरेस ज्वेलरी फसवणुकीच्या संबंधित मुंबई आणि जयपूरमधील दहा ठिकाणी छापा टाकला आहे.

कंपनीने चार योजना आणल्या होत्या. सोन्यामध्ये गुंतवणूक करा आणि आठवड्याला दोन टक्के व्याज घ्या, चांदीत गुंतवणूक केल्यास तीन टक्के, मोझानाईट खड्यात गुंतवणूक केल्यास चार टक्के, पण केवळ मोझानाईट खड्यात गुंतवणूक केली तर पाच ते सहा टक्के व्याज अशा त्या योजना होत्या. रोख रकमेद्वारे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा (११ ते १४ टक्के) देण्याचे अमिष दाखविले जात होते. जर गुंतवणूकदारांनी आणखी गुंतवणूक आणल्यास त्यांना सरसकट २० टक्के व्याजाचे अमिष दाखविण्यात आले. यासाठी कंपनीमार्फत परिसंवादाचेही आयोजन केले जात होते. आम्हाला सोने एकदम स्वस्तात मिळते. त्यावर ३०० टक्के नफा मिळतो. त्यामुळेच आम्ही इतके व्याज देऊ शकतो, असेही सांगितले जात होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR