31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeअंतरराष्ट्रीयट्रम्प विरोधात हजारो लोक रस्त्यावर, देशभर निदर्शने

ट्रम्प विरोधात हजारो लोक रस्त्यावर, देशभर निदर्शने

 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अनेक नवीन नियम लागू केले आहेत. नव्या नियमांच्याविरोधात आता अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात लोकांचा रोष उफाळून आला आहे. पुन्हा एकदा हजारो निदर्शकांनी अमेरिकेत निषेध रॅली काढली, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा तीव्र विरोध केला.

न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि शिकागो सारख्या शहरांमध्ये ५ एप्रिल रोजी झालेल्या निदर्शनांपेक्षा कमी लोक सहभागी झाले होते. फ्लोरिडामधील जॅक्सनव्हिल ते लॉस एंजेलिसपर्यंत देशभरात ७०० हून अधिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.

इमिग्रेशन, संघीय नोक-यांमध्ये कपात, आर्थिक धोरणे आणि इतर मुद्द्यांवर चिंता व्यक्त करून निदर्शकांनी राष्ट्राध्यक्षांवर नागरी स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य चिरडल्याचा आरोप केला. मला काळजी वाटते की प्रशासन योग्य प्रक्रियेशिवाय बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करणे थांबवणार नाही आणि त्याऐवजी अमेरिकन नागरिकांना तुरुंगात टाकेल आणि हद्दपार करेल, असे वॉशिंग्टनमधील रॅलीला उपस्थित असलेले आरोन बर्क म्हणाले.

ट्रम्प यांच्या निर्णयाने जगभरातील अर्थव्यवस्था हलल्या आहेत. यातून खुद्ध अमेरिकाही सुटली नाही. अमेरिकेतील उद्योगांनाही याचा फटका बसला आहे. पण, याचे परिणाम आता ट्रम्प सरकारला भोगावे लागू शकतात. कारण, अमेरिकेतील एका कायदेशीर संघटनेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारविरुद्ध व्यापक शुल्क आकारणीबद्दल खटला दाखल केला आहे. या संघटनेने अमेरिकन आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाला ट्रम्प यांच्या अमेरिकन व्यापारी विक्रेत्यांवरील कर रोखण्याची विनंती केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR