22.5 C
Latur
Thursday, October 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे : ठाणे शहर मतदार संघातून विधानसभा निवडणूक २०२४ ठाण्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आजचा दिवस हा गुरुपुष्यामृत योग असा महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरण्यास दिग्गजांनी सुरूवात केली आहे.

राजकीय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली असल्याने या महत्वपूर्ण मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन करत प्रत्येकजण आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्नात आहेत.

जोरदार शक्तिप्रदर्शन करत समर्थकांच्या विजयी घोषणेच्या जल्लोषात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना सोबत नरेश मणेरा आणि केदार दिघे यांच्यासह समर्थक, प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR