24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे वरचढ होण्याची भीती

ठाकरे वरचढ होण्याची भीती

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नव्याने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत तर दुसरीकडे यावेळी भाजपचा आकडा थेट बहुमताच्या जवळ गेल्याने भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा आणि फडणवीस यांच्याकडे राज्याची धुरा सोपवावी, अशी भाजप नेत्यांची मागणी आहे. आता भाजप नेत्यांनी लॉबिंग सुरू केल्याने शिंदे नाराज झाले असून, जर मुख्यमंत्रिपद गेले, तर उद्धव ठाकरे पुन्हा वरचढ होऊ शकतात, अशी शिंदेंना भीती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, हा एकच प्रश्न सर्वतोमुखी आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. मात्र, मुख्यमंत्रीपद जाणार याची कुणकुण लागताच एकनाथ शिंदे कमालीचे सावध झाले आहेत. त्यांनी सोमवारी संध्याकाळपासून सगळ््या भेटीगाठी रद्द केल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आग्रही आहेत. तरीदेखील भाजपकडून अद्याप अपेक्षित हालचाली घडत नसल्याने पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरु आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता उद्धव ठाकरे यांची ताकद किमान पुढील पाच वर्षांसाठी जवळपास संपल्यात जमा आहे, असा अनेकांचा समज आहे. मात्र, जरा बारकाईने विचार केल्यास उद्धव ठाकरे यांना मुंबईत मिळालेल्या १० जागा या अजूनही भाजपसाठी डोकेदुखी मानली जात आहे. राज्यभरात ठाकरे गटाचा सुपडा साफ झाला असला तरी मुंबईत त्यांची ताकद अजूनही शिल्लक आहे. मुंबईतील ३६ ंपैकी १० जागा ठाकरे गटाने ंिजकल्या आहेत तर शिंदे गटाला ६ आणि भाजपला १४ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट कमबॅक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाकरे गट होणार आक्रमक
महायुतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद न दिल्यास शिवसेनेत नाराजी पसरेलच. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला आयते कोलीत मिळेल. मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. पालिकेचा २७ हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प हा देशातील अनेक राज्यांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे मुंबईची सत्ता काबीज करणे, भाजपसाठी महत्त्वाचे आहे. पण यात शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या जातील. याचा फटका शिंदे गटाला बसू शकतो.

वेगळा मॅसेज जाण्याची चिंता
उद्धव ठाकरे यांच्यानंतर भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबतही तसेच वागणार किंवा भाजपने केवळ सत्ता येईपर्यंत शिंदेंचा वापर करुन घेतला आणि आता त्यांना बाजुला सारले, असा मॅसेज शिवसैनिकांमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे मराठी मतदारांच्या मनातही चलबिचल होऊ शकते. एवढी एक गोष्ट उद्धव ठाकरे यांना राखेतून पुन्हा उभारी द्यायला मदत करु शकते, अशी शिंदेंना भीती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR