ठाणे : प्रतिनिधी
ठाकरे गटाच्या वतीने रविवारी ठाण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आनंदआश्रमासमोर ठाकरे-शिंदेंची सेना आमने-सामने आली. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
आनंदआश्रमासमोरील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अभिवादन केले. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी राऊत यांनी पुतळ्याला घातलेला हार शिंदे यांच्या शिवसैनिकांनी काढून टाकत अभिषेक करण्यात आला .
एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात शिवसेना उबाठाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत दाखल झाले आहेत. शिंदे सेनेच्या नेत्यांकडून ठाकरे सेनेच्या नेत्यांना विरोध केला जात आहे. ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते.
आनंदआश्रम परिसरात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. या ठिकाणी ठाकरे गटाला येण्यास शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली.