34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रडाळ मिलचे स्टोरेज युनिट कोसळले; तीन मजूर ठार

डाळ मिलचे स्टोरेज युनिट कोसळले; तीन मजूर ठार

यवतमाळ येथील धक्कादायक घटना

यवतमाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. येथे एका डाळ मिलमध्ये तीन मजुरांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. तर इतर दोन जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात यवतमाळच्या एमआयडीसी परिसरातील एका डाळ मिलमध्ये झाला आहे. बुधवारी पोलिसांनी ही माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या एका डाळ मिलमध्ये मजूर काम करत होते. तेव्हा स्टीलचे बनवलेले साठवण युनिट कोसळल्याने तीन श्रमिकांचा जीव गेला. इतर दोन मजूर जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी संध्याकाळी यवतमाळच्या एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) परिसरातील मनोरमा जैन डाळ मिलमध्ये घडली. पोलिस अधिका-याने सांगितले की, स्टोरेज युनिट तुटून पाच मजुरांवर कोसळले होते.

दोन मजूर मध्य प्रदेशचे
पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. इतर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मजुरांमध्ये दोन मध्य प्रदेशचे आणि एक महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचा रहिवासी होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR