डिझेल-पेट्रोल टंचाईविरोधात शेतकरी आक्रमक

हिंगोली : प्रतिनिधी
डिझेल व पेट्रोलची महागाई तसेच टंचाईच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी ता. १९ गोरेगाव चौफुली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महागाई कमी करून इंधन मुबलक उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ८६ डिझेल पंपांसाठी दोन लाख ते अडीच लाख लिटरची आवश्­यकता असते. सध्या शेती मशागतीची कामे व इतर कामांमुळे डिझेलची मागणी साडेतीन लाख लिटरपर्यंत गेली आहे. मात्र जिल्ह्याला वाढीव पुरवठा होत नसल्याने डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात डिझेल पंपावर डिझेल मिळविण्यासाठी रांगा लागत असून तब्बल तीन ते चार तास रांगेत थांबावे लागत आहे. त्यातच इंधनाची दरवाढ करण्यात आली आहे. डिझेल तुटवड्यामुळे शेती मशागतीच्या कामांवर गंभीर परिणाम होत आहे. पेरणीपूर्व मशागत, फवारणी, पाणीपुरवठा यासाठी डिझेल अत्यावश्यक असताना शेतक-यांना पंपावर डिझेल मिळत नसल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे.

दरम्यान, केंद्र व राज्य शासनाकडून इंधन उपलब्धतेकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव चौफुली येथे आंदोलन केले. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या नियोजनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शासनाने तातडीने डिझेल उपलब्ध करून द्यावे अन्यथा शासनाच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01

Latest news