34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeसोलापूरडीपी बसविण्याच्या बहाण्याने खोट्या पावत्या देऊन फसवणूक

डीपी बसविण्याच्या बहाण्याने खोट्या पावत्या देऊन फसवणूक

मोहोळ : शेतात नवीन डीपी बसविण्याच्या बहाण्याने मंगेश लक्ष्मण जाधव (रा. किणी, ता. अक्कलकोट) याने मोहोळ तालुक्यातील सात शेतकऱ्यांना खोट्या पावत्या देऊन जवळपास एक लाख १२ हजार रुपये घेतले.
पण, त्याने डीपी बसवून देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकरी मोहोळच्या महावितरण कार्यालयात गेले. त्यावेळी मंगेश जाधव याने दिलेल्या पावत्या खोट्या असल्याचे समोर आले. त्यानंतर लहू भगवान खडूस (रा. वाफळे, ता. मोहोळ) यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली.

वाफळे (ता. मोहोळ) येथील शेतातील विहिरीवर मिनी डीपी बसविण्यासाठी फिर्यादी लहू खडूस यांनी वायरमन मंगेश जाधव याच्याशी संपर्क केला. त्यावेळी सुरवातीला २५ हजार रुपये भरावे लागतील म्हणून पैसे घेतले. त्यानंतर निवडणूक चालू असल्याचे कारण दिले.

काही दिवसांनी प्रस्ताव मंजुरीला मुख्य कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगितले. खूप विलंब लागत असल्याने मोहोळ येथील उपअभियंता कार्यालयात चौकशी केली, त्यावेळी त्याने फसवणूक केल्याची बाब उघड झाली.त्याने गावातील संतोष जाधव, कृष्णाजी दाढे, गोरख चव्हाण, विक्रम माने, राजाराम माने, आबासाहेब खडूस, संजय मगर यांच्याकडूनही पैसे घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस हवालदार ओहोळ तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR