21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरडॉ. नाकाडे यांचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील 

डॉ. नाकाडे यांचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील 

लातूर : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु तसेच लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शिवराज नाकाडे यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त दु:खद असल्याची भावना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. शैक्षणिक सामाजिक आणि मराठवाड्याच्या विकासातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, आदरणीय डॉ. शिवराज नाकाडे यांनी शिक्षण संस्थाचालक, कुलगुरु, प्राचार्य, म्हणून  शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले, मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाचे सदस्य म्हणूनही  त्यांनी मराठवाड्याच्या विकासाला चालना दिली, आदरणीय विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.  नाकाडे कुटुंबीयांच्या या दु:खात मी व देशमुख कुटुंबीय सहभागी आहोत. त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्त्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो असे शेवटी आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR