20 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

विंदांचे गद्यरुप या समीक्षात्मक पुस्तकासाठी पुरस्काराची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मराठी साहित्यातील एक अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकासाठी २०२४ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे आनंद झाला असून, आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली.

विचक्षण लेखक आणि वाचनमग्न समीक्षक म्हणून साहित्य क्षेत्रात स्वत:ची नादमुद्रा असलेले डॉ. सुधीर रसाळ आता ९१ व्या वर्षातदेखील उत्साहाने साहित्य सेवा करीत आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून ख्यातकीर्त आहेत. या पुरस्काराची घोषणा होताच डॉ. सुधीर रसाळ यांनी हा पुरस्कार भारतात सर्वात सन्मानाचा पुरस्कार आहे. माझ्या आयुष्यात सगळ््यात जास्त समाधान या पुरस्काराने मिळवून दिले आहे. मोठ-मोठे समीक्षक, विचारवंत यांना हा पुरस्कार देण्यात आला. तेव्हा अशा मोठ्या माणसांसोबत आपले नाव जोडले गेले, याचा आनंद आहे, असे म्हटले.

साहित्य अकादमीचा पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. यंदाच्या वर्षासाठी जी पुस्तके पाठविण्यात आली, ती सगळीच तुल्यबळ होती. नदिष्ठ, भुरा, बौन हा सौमित्र यांचा कवितासंग्रह होता, अभिराम भडकमकरांची इन्शाअल्लाह ही कांदबरी होती, अशा १२ पुस्तकांमधून विंदांचे जे समीक्षात्मक पुस्तक आहे, त्याची निवड करण्यात आली. सुधीर रसाळ हे समीक्षकांमधील फार मोठे नाव आहे. त्यामुळे त्यांना मिळालेला हा पुरस्कार अत्यंत योग्य असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR