24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्र...तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल : हाके

…तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल : हाके

मुख्यमंत्री शिंदे यांना दिला इशारा
सांगोला : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोय-याच्या अध्यादेशासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला असून आता सरकारने रात्रीत काय तो निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. दुसरीकडे सगेसोयरेच्या अध्यादेशावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टीकेवरून निषेध व्यक्त केला. एवढेच नव्हे, तर सगेसोयरेचा अध्यादेश काढल्यास राज्यातील लाखो ओबीसी समाज मुंबईत धडकेल, असा इशारा दिला.

उपोषण मागे घेतल्यानंतर सांगोला येथे लक्ष्मण हाके आले असता ओबीसी बांधवांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना हाके यांनी सगेसोयरे अध्यादेशावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला. जर सगेसोयरे अध्यादेश काढला तर राज्यातील लाखो ओबीसी समाज मुंबईत धडकेल आणि मुंबई जाम करू, तुम्ही १२ कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात हे लक्षात ठेवा, असा थेट इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR