32 C
Latur
Sunday, May 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीय...तर पाकला विनाशकारी उत्तर देणार! अमेरिकी उपराष्ट्राध्यक्षांना मोदींनी सुनावले

…तर पाकला विनाशकारी उत्तर देणार! अमेरिकी उपराष्ट्राध्यक्षांना मोदींनी सुनावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानने जर काही केलं, तर भारताचे उत्तर विनाशकारी आणि कठोर असेल. जसे पाकिस्तानने २६ ठिकाणांना लक्ष्य केल्यानंतर दिले गेले, अशा स्पष्ट शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात चर्चा झाली. यावेळी मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पहिला प्रहार ६-७ मेच्या रात्री केला. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तेव्हापासून दोन्ही देशातील लष्करी संघर्ष वाढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, जर पाकिस्तानने काही आगळीक केली, तर त्याला विनाशकारी आणि कठोर उत्तर दिलं जाईल. भारताने त्यांच्या तळांवरच हल्ले केले, असे मोदी व्हान्स यांच्याशी बोलताना म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासूनच पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यास सुरूवात झाली. भारताने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केल्यानंतर पिसाळलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्काराची ठिकाणे आणि गावांवरच हवाई हल्ल्याचे प्रयत्न केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR