अक्कलकोट : ३१ जुलै पर्यंत सर्व शेतकऱ्यांची ऊस बिल देण्याचे तसेच इतर सर्व मागण्या संदर्भात संबंधित विभागाशी मीटिंग लावण्याच्या लेखी आश्वासन तहसीलदार विनायक मगर यांनी दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ३१ जुलै पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आनंद बुक्कानुरे यांनी दिली.
तहसीलदार अक्कलकोट यांचे अध्यक्षतेखाली ऊस बिल थकबाकी विषयीची नवीन तहसील कार्यालय अक्कलकोट येथे बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकिस ऊस उत्पादक शेतकरी व जय हिंद कारखाना यांचे प्रतिनिधी दत्तात्रय तोरणे, गोकुळ कारखाना यांचे प्रतिनिधी श्री. अनिल कस्तुरे उपस्थित होते.
अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील गोकुळ शुगर कारखाना, धोत्री जय हिंद शुगर
कारखाना आचेगाव, मातोश्री शुगर कारखाना, सिद्धेश्वर साखर कारखाना थकबाकी ठेवलेले ऊस बिल लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अक्कलकोट तालुक्यातील सर्व गावातील तलावांना उजनी पाण्याने जोड देऊन देगाव कालवा एक्सप्रेस पाईपलाईन द्वारे जेऊर जिल्हा परिषद मंगरूळ जिल्हा परिषद नागणसूर जिल्हा परिषद मधील प्रत्येक गावातील प्रत्येक तलावाला पाईपलाईनने जोड देऊन पाणी सोडावे .
एकरूप उपसा सिंचन योजनेद्वारे अक्कलकोट मैंदर्गी दुधनी नगरपरिषद तसेच सलगर चपळगाव वागदरी जिल्हा परिषद मधील सर्व गावाला जोड देऊन सर्व गावातील तलाव भरण्यात यावा, अक्कलकोट तालुक्यातील सोलर कंपन्यांनी करोडो झाडांची कत्तल केली आहे त्या संबंधित अधिकाऱ्यासहित कंपन्यावरती गुन्हे दाखल व्हावे .
नुकसान केलेले झाडाची पुनर लागवड करावी नवीन सोलर कंपनीला परवानगी देऊ नये सध्या कार्यरत असलेल्या सोलर कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा या प्रमुख मागण्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्याभरापासून तहसील कार्यालय येथे बोंबाबोंब कडाक्याचा हलगी नाद विविध लोक कला जागरण गोंधळ रास्ता रोको यासारखे अनोखे आंदोलन शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी सोपान निकते, महांतेश हत्तुरे, राम जाधव महमूद पठाण मल्लिनाथ अर्वतकल, शांतवीर कळसगोंडा, गुरनिंगप्पा पाटील, नितीन मोरे, संतोष पाटील, सिद्धाराम बिराजदार, धनराज चव्हाण, उमेश साळुंखे अफसर मकानदार, सुनील धर्मसाले, शिवा परीट, शरणू हंदरळ सह शेतकरी शिवसैनिक व पदाधिकारी मोठे संख्येने उपस्थित होते.