24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरतालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण

रेणापूर : प्रतिनिधी
येथील पंचायत समिती शिक्षण विभाग व श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. ५ ते ६ डिसेबर दरम्यान आयोजीत करण्यात आले होते. या प्रदर्शनात ६५ प्रयोग सादर करण्यात आले. बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले .

अध्यक्षस्थानी रेणूका शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड.पंडीतराव उगीले हे होते तर गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, प्राचार्य सतिष गोडभरले, शिक्षण विस्तार अधिकारी मोतूलाल शारवाले, मुख्याध्यापक सतिष मोरे, पर्यवेक्षक सिध्देश्वर मामडगे, प्रा. भरत धायगुडे यांची प्रमूख उपस्थिती होती. यावेळी संगिती शिक्षक महादेव बन व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य गोडभरले यांनी केले. गट शिक्षणाधिकारी संजय पंचगले यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप सचिव अँड उगिले यांनी केला. परिक्षक राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिवंिलग नागापूरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार अमृतेश्वर स्वामी यानी केले.

प्रदर्शनातील पारितोषीक विजेत्यांमध्ये प्राथमिक गटात बिटरगाव येथील जि.प. प्रा शाळा तर माध्यमिक उच्च माध्यमिक मध्ये रेणापूर येथील मुहम्मदिया उर्दू स्कूल प्रथम, प्राथमिक गटात प्रथम – प्रगती जगताप- (जि. प. प्रा .शाळा , बिटरगाव) द्वितीय- समृद्धी कातळे (श्रीराम विद्यालय, रेणापूर) तृतीय सृष्टी पलमटे (जि. प. प्रा. शाळा, माणूसमारवाडी). माध्यमिक उच्च माध्यमिक गट प्रथम -अत्तार अदिबा (मुहम्मदिया उर्दू स्कूल, रेणापूर) द्वितीय- शौनक धर्माधिकारी (श्रीराम विद्यालय , रेणापूर) तृतीय -पवार नंदिनी ( शिवाजी विद्यालय, बिटरगाव) दिव्यांग उत्तेजनार्थ – हर्षवर्धन देशमुख – (श्रीराम विद्यालय, रेणापूर) प्राथमिक शक्षिक गट -प्रथम- एल. अंकलकोटे (जि प प्रा शाळा , कुंभारवाडी) शिक्षक – माध्यमिक उच्च माध्यमिक गट – बी टी -सोमवंशी (सरस्वती विद्यालय, स्ािंधगाव) -प्रयोग शाळा सहाय्यक गट – प्रथम -एस. एन. भातांब्रे (श्रीराम विद्यालय, रेणापूर) या स्पर्धेचे परीक्षण शिवंिलंग नागापूरे, मनोज मोटे, कासराळे, संगवी यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR