लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी धिरज देशमुख यांना पाच वर्षांपुर्वी भरभरुन आशिर्वाद दिले. त्यामुळे ते आमदार झाले. आमदार झाल्यानंतर धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणचा सर्वांगिण विकास केला. हा विकास मतदारांच्या आशिर्वादामुळे होऊ शकला. त्यामुळे आगामी काळातही मतदारांनी आमदार धिरज देशमुख यांच्या पाठीशी आशिर्वाद कायम ठेवावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर तालुक्यातील कोळपा येथे दि. २९ ऑगस्ट रोजी महिला बचत गटांचा मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांना संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या अध्यक्षा सौ. दीपशिखा धीरज देशमुख, सुनिता अरळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर तालुक्यातील कोळपा येथे महादेव मंदीर सभागृहात बचत गटांच्या महिलांची बैठक झाली. यावेळी झालेल्या बैठकीत बोलतांना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमूख म्हणाल्या, राज्य सरकारकडून गेल्या दहा वर्षापासून फक्त आणि फक्त भुल थापांचा पाऊस पडत आहे. या भुल थापांना महिला मंडळीनी बळी पडू नये. तसेच आपल्या अडी-अडची जाणुन घेणा-या, आपल्या सुख-दु:खात आपल्यासोबत असलेले लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या पाठीशी उभारुन त्यांना सर्व महिलांनी सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून देवून परत लातूर ग्रामीचा सर्वागीण विकास करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले.
कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अनेक योजना राबल्या आहेत. मात्र त्या योजनेची खोटी जाहीरात कधीच कॉंग्रेस पक्षाने केली नाही. आपल्या पक्षाच्या योजना ही गोर-गरीब, शेतकरी, मजुर यांच्यासाठी राबवल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्रात आपले हक्काचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी आपले लातूर ग्रामींणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांना येणा-या विधानसभा निवडणूकीत आपला भाऊ निवडणूकीच्या मैदानात आहे म्हणून मोठ्या मताधीक्यानी विजयी करुन आपल्या लातूर ग्रामीणचा विकास करायची संधी पुन्हा एकदा द्यावी असे, आवाहन केले.
यावेळी रीड लातूरच्या संस्थापिका सौ. दीपशिखा धीरज देशमुख म्हणाल्या, आज आपल्या गावात येऊन आपल्याशी संवाद साधून आपल्या अडी-अडचणी जाणून घेऊन आनंद वाटला. गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी आमदार म्हणून काम करताना जास्तीत जास्त विकास योजना गावापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गावामध्ये त्यांनी गार-गरीब, शेतक-यांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे देखील आपल्यासाठी ते असेच काम करीत राहणार आहेत. कोळपा आणि परिसरातील गावात महिला बचत गटाची चळवळ चांगली रुजली आहे. या बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार अधिक करता यावेत त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी सर्व उद्योग व्यवसायाची माहिती मिळावी याकरिता वेगवेगळया शिबिराचे आयोजन गाव पातळीवरील करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी प्रभावती कातळे, शारदा स्वामी, सुरेखा देवकते, छबाबाई खानापुरे, गावचे सरपंच सिध्देश्वर श्रीरगिरे, चेरमन विवेक अंबेकर, नंदकिशोर पाटील, विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभास माने, रगुनाथ शिंदे, सरोजा स्वमी, मंगल कातळे, संगीता स्वामी, निर्मला खानापूरे, वाहेद पठान, अल्का कातळे, ज्योती कातळे, राधा मगर, सुप्रिया मगर,जयश्री खानापूरे संगीता श्रीगिरे आदींसह महिला उपस्थित होत्या.