सायबर गुन्हेगारांनी घातला ७ हजार कोटींना गंडा!

फसवणुकीचे वर्षभरात ८ हजार ९७४ गुन्हे, राज्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई तसेच राज्यभरात सध्या सायबर गुन्ह्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षभरात राज्यात एकूण ८ हजार ९७४ फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्याअंतर्गत तब्बल ७ हजार ६३४ कोटी २५ लाख ४६ हजार ५०८ इतक्या रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत सर्वाधिक ४ हजार ८४९ गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी पुण्यात सर्वाधिक ६ हजार ७ कोटी ९३ लाख ४ हजार ३९८ रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली.

विधानसभेत आमदार मोहन मते, ज्योती गायकवाड, विकास ठाकरे, अमिन पटेल, सुनील प्रभू यांच्यासह इतर अनेक पक्षातील आमदारांनी राज्यातील नागरिकांची विविध प्रकरणात झालेल्या सायबर फसवणुकीबाबत लेखी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात वरील माहिती दिली. या आकडेवारीनुसार मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे या शहरांमधील सायबर फसवणुकीबाबतची माहिती जाहीर केली.

या आकडेवारीनुसार मुंबई शहरात गेल्या वर्षभरात ४ हजार ८४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ७५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या ४ हजार ८४९ गुन्ह्यात एकूण ८८८ कोटी २९ लाख २३ हजार ९५ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती तर ठाणे शहरात ६८० गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांना अटक करण्यात आली होती. यात एकूण १७४ कोटी ४ लाख ३६ हजार ६ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर शहरात एकूण २१२ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ६३ कोटी ८५ लाख ९ हजार ५०१ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे तर पुणे शहरात एकूण १५०४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ९ जणांना अटक करण्यात आली असून पुण्यातून ६ हजार ७ कोटी ९३ लाख ४ हजार ३९८ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. हे वाढते प्रकार अत्यंत चिंतनीय आहेत. कारण अलिकडे ऑनलाईन आर्थिक व्यवहारात वाढ झाली आहे. त्यातच अकाऊंट हॅक करून किंवा वेगवेगळे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे.

असुरक्षेची भावना वाढली
काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरतानाच चार पैसे हाताशी ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. परंतु खात्यात जमा केलेल्या पैशांवर सायबर गुन्हेगार नजर ठेवून वेगवेगळ््या माध्यमातून लोकांची फसवणूक करीत खात्यावरील पैशांवर डल्ला मारत आहेत. राज्यात सायबर गुन्हेगारी वाढली असून, वाढती गुन्हेगारी आणि पैशांची लूट पाहता नागरिकांची चिंता वाढली असून, असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात गेल्या महिनाभरात तयार झालेले अक्वान...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे कोच कारखान्याची धीरज देशमुखांकडून पाहणी; रोजगार आणि वंदे भारत बोगींचा आढावा
06:39
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक? आरोग्य विभागाची नागमाता दवाखान्यावर धाड
00:47
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामस्थांचे उलटी हलगी वाजवून आंदोलन
10:08
Video thumbnail
Nanded|अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामावरून वाद; काँग्रेसचे आरोप, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
04:12
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा आढावा; अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणार?
03:47
Video thumbnail
Latur|CBI चार्जशीटमध्ये नाव असलेल्यांनी खुलासा करावा; धिरज देशमुखांचा विरोधकांना सवाल
03:59
Video thumbnail
Latur|विलास सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे पारदर्शक? अचानक तपासणीत तफावत नसल्याचा दावा
03:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये श्वान निर्बीजीकरण कामाची चौकशी होणार; स्थायी समितीचा मोठा निर्णय
06:35
Video thumbnail
Latur|संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ; संविधान दिन जनजागृतीतून साजरा करा – भंते पय्यानंद
03:19
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये संविधान दिन उत्साहात; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
02:17
Video thumbnail
Latur|आयुष्यमान भारत मिशनचा लातूर जिल्ह्यात आढावा; ५७ टक्के लाभार्थ्यांची कार्ड जनरेट
02:44
Video thumbnail
Beed|कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक दाखल
01:28
Video thumbnail
Sanjay Bansode|कृष्णा खोऱ्यातील 2 टीएमसी पाणी लातूरला द्या! संजय बनसोडेंची मागणी
03:50
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धिरज देशमुख जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी; निवडीनंतर जल्लोष आणि भव्य रॅली
02:07
Video thumbnail
Latur DCC Bank Election| बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा धिरज देशमुख; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव पाटील
06:17

Latest news