22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रते पुन्हा आले! फडणवीसांच्या दमदार ‘कमबॅक’चे रहस्य

ते पुन्हा आले! फडणवीसांच्या दमदार ‘कमबॅक’चे रहस्य

लातूर : निवडणूक डेस्क
‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा’, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होऊ लागतातच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या भाषणातील या ओळी आता अनेकांना आठवत आहेत.

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली लढलेला भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण, उद्धव ठाकरे यांनी युती तोडली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवेंद्र फडणवीसांनी दमदार कमबॅक केलं. राज्याच्या राजकारणातलं खणखणीत नाणं आणि विश्वासार्ह चेहरा असल्याचं फडणवीसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. जाणून घेऊया या यशामागील चार रहस्य…

विकासाचं व्हिजन
महायुती सरकारच्या काळात मुंबई तसंच महाराष्ट्रात झालेले पायाभूत प्रकल्प, मुंबईत वाढलेलं मेट्रोचं जाळं, राज्यातील परकीय गुंतवणूक, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, वाढवण बंदरामुळे होणारा राज्याला आणि देशाला फायदा हे सर्व मुद्दे फडणवीसांनी भाषणातून सातत्यानं मांडले. त्यांचे मुद्दे राज्यातील मतदारांना, विशेषत: शहरी मतदारांना भावल्याचं या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे.

आक्रमक हिंदुत्व
देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारात आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. ‘व्होट जिहाद’ ला ‘धर्मयुद्ध’ने उत्तर द्या, हे आवाहन मतदारांना केलं. फडणवीसांच्या या प्रचारामुळे लोकसभेत निष्क्रीय राहिलेला भाजपाचा पारंपरिक मतदारांमध्ये उत्साह संचारला. ते पुन्हा सर्वशक्तीनीशी प्रचारात उतरले. त्याचबरोबर नवमतदारही भाजपकडे आकर्षित झाले. त्याचा फायदा भाजपला झाला. भाजपला हा फायदा मिळवून देण्यात फडणवीसांची रणनीती यशस्वी ठरली.

मित्रपक्षांशी समन्वय
भाजपने विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांच्या मदतीनं निवडणूक लढवली. जागा वाटपाचा प्रश्न सोडविण्यात फडणवीसांची भूमिका महत्त्वाची ठरली. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत कायम होता. अगदी निवडणुकीच्या दिवशी सुशीलकुमार शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्याने सहकारी पक्षाच्या विरोधात उघड भूमिका घेतली. महायुतीमध्ये हे प्रकार कमी करण्यात फडणवीसांचा मोठा वाटा होता. त्याचा भाजपसह महायुतीलाही फायदा झाला.

जरांगे फॅक्टरवर मात
मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन हे देवेंद्र फडणवीसांच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा मानलं जात होतं. त्या आंदोलनाचा फटका लोकसभेत भाजपला बसला. पण, विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरवर मात करण्यासाठी भाजपची रणनीती यशस्वी झाली. जरांगे फॅक्टरवर मात करणारी रणनीती आखण्यात फडणवीस आघाडीवर होते. भाजपचं आक्रमक हिंदुत्व आणि ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा निर्णायक ठरली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR