परभणी : परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परीसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणा-या आरोपीला देशद्रोही जाहीर करून नागरिकत्व रद्द करावे. तसेच त्याची नार्को तपासणी करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शनिवार, दि.१४ रोजी पत्रकार परिषदेत केली.
प्रा. कवाडे यांनी शनिवारी परभणीत भेट देवून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परीसराची भेट देवून पाहणी केली. तसेच भीम नगरात पोलिसांकडून झालेल्या अत्याचारात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर प्रभारी पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांची भेट घेवून चर्चा करत मागण्यांचे निवेदन दिले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, प्रदेश महासचिव बापूराव गजभारे, प्रदेश संघटक गौतम मुंढे, अरुण गायकवाड, संजय शिंदे, दीपक धापसे, मोहन गायकवाड, चंद्रकांत कांबळे, हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप भिसे, नारायण गायकवाड, साहेबराव सोनकांबळे यांची उपस्थिती होती.