23.3 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeलातूर‘त्या’ पार्टनरशीपसाठी कॅफेत अल्पवयीनांना ‘आडोसा’

‘त्या’ पार्टनरशीपसाठी कॅफेत अल्पवयीनांना ‘आडोसा’

लातूर : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलांना मैत्रीच्या पहिल्या पायरीवर नेऊन हीच मैत्री पुढे टोकाच्या भूमिका घ्यायला भाग पाडणारी म्हणून लातूर शहरासह जिल्ह्यात शाळा, कॉलेजच्या परिसरात वाढलेले कॅफे ही मोठी समस्या केंद्र निर्माण झाली आहे. पहिली ओळख, पुढे मैत्री, त्यानंतर कॅफेचा आडोसा आणि लॉजवरची अखेर ही जीवन उद्ध्वस्त करणारी कहाणी अगदी काही दिवसांत तयार होताना पाहायला मिळत आहे. तर परवा कॅफे सेंटर मध्ये घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे तर या अनाधिकृत कॅफेसेंटर मध्ये गुटखा, सिगारेट आणि दारूसह आदी नशिले पदार्थ ही सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा सुरू आहे.

अंधार व आडोसा अशी कॅफेची रचना आणि त्यामध्ये मिळणारी संशयास्पद पेय याकडे तसेच अल्पवयीन मुला- मुलींना थेट प्रवेश देऊन आपला गल्ला भरणारे लॉजचालक यांच्याकडे स्थानिक महानगरपालिका प्रशासन किंवा पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातूनच भयानक, किळसवाणे प्रकार घडू लागले आहेत. किशोवयीन मुलांच्या पालकांची झोप उडवणारी ही स्थिती बदलण्याची सामजिक गरज बनली आहे. शिक्षणासाठी प्रसिध्द असलेल्या लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात नुकताच एक गुन्हा गांधीचौक पोलिसांनी दाखल केला आहे.

शैक्षिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या लातूर शहराच्या ऐतिहासिक व शासकीय व खासगी मालकीच्या इमारतीतीलभर हमरस्त्यावरील असे कॅफे लक्ष वेधून घेतात. यामुळे लातूरच्या शैक्षणिक महतीला या घटनेने गालबोट लागले आहे. लातूर पॅर्टन मुळे लातूर शहरात वास्तव्यास मोठी पसंती आहे. बहुतांश विद्याथी, पालक, नागरिक बाहेरच्या तालुका, जिल्हा, राज्यातील आहेत, त्यांच्या विश्वासाला मात्र अशा प्रकारामुळे तडा जात आहे.

पालकांनी ही आपल्या मुलांवर लक्ष दिले पाहिजे. याबरोबरच ज्या शहरात, शैक्षणिक संस्थांमध्ये मुले शिक्षण घेतात अशा शाळा, कॉलेजच्या शहरात उभे राहणारे कॅफे आणि तसे व्यवसाय यावरही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी करडी नजर ठेवली पाहिजे. आक्षेपार्ह प्रकार घडत असल्यास पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत. तर कमी वेळात आणि कमी खर्चात जास्त पैसे मिळवण्यासाठी नियम डावलून मुला- मुलींना सर्रास प्रवेश दिल्या जाणा-या अनाधिकृत कॅफे, लॉजवर अवेळी गस्त घालत पोलिसांनी अशा व्यावसायीकावर कायमस्वरूपी कडक कारवाई केली पाहिजे, अशी पालकांची मागणी आहे. पोलिसांनी आर्थिक तडजोडी केल्या नाही तर अशा अनेक लॉजवर बंदी येऊ शकते असे ही नागरीकांतून बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR