24.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रत्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचे देवस्थानला पत्र

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचे देवस्थानला पत्र

नाशिक : प्रतिनिधी
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वराच्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या प्रांगणात मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगणा प्राजक्ता माळी हिच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मात्र, त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा प्राजक्ता माळी यांचा कार्यक्रम अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांवर पुरातत्व विभागाकडून आक्षेप व्यक्त केला जात आहे, असे पत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानला पुरातत्व विभागाकडून देण्यात आले आहे.

देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते. अशातच यंदा महाशिवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम देवस्थान ट्रस्टने आयोजित केला आहे. पण, या कार्यक्रमावर आधीच माजी विश्वस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच, आता पुरातत्व विभागाने आक्षेप व्यक्त केल्यामुळे एकंदरीतच कार्यक्रम रद्द होणार की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना पुरातत्व विभागाचा आक्षेप व्यक्त करत पुरातत्व विभागाने त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र लिहिले आहे. महाशिवरात्रीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळ, अवशेष अधिनियम १९५८ या कायद्यानुसार पुरातत्व विभागाकडून आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. कार्यक्रमापूर्वी दिल्लीच्या कार्यालयातून परवानगी घेण्याचे आदेश पुरातत्व विभागाने दिले आहेत.

मंदिर समितीच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनीही प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. मंदिरात गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, व्हीआयपी दर्शनासाठी उत्तरेकडील गेटवर २०० रुपये शुल्क घेतल्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. अशा प्रकारे प्रवेश शुल्क घेणे एएमएएसआर कायद्याचे उल्लंघन आहे, अशातच देवस्थान ट्रस्टने तातडीने सुधारात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पुरातत्व विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR