22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयथायलंडच्या राजदुताला पदावरून हटविले

थायलंडच्या राजदुताला पदावरून हटविले

भारतावर टीका करणे पडले महागात थायलंडने केली कठोर कारवाई

नवी दिल्ली : भारताच्या तांदुळ खरेदी धोरणावर थायलँडच्या राजदूत पिमचानोक वॉनकोपोर्न पिटफील्ट यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताने याचा कडक शब्दांत निषेध व्यक्त केला होता. थायलंडमधील एका वरिष्ठ सरकारी अधिका-याच्या माहितीनुसार, पिटफील्ट यांना राजदूत पदावरुन हटवण्यात आले असून त्यांना देशात परत बोलावण्यात आले आहे.

जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूटीओ) १३ व्या मंत्रिस्तरीय संमेलनात (एमसी-१३) बोलताना पिटफील्ट यांनी भारताच्या तांदुळ खरेदी धोरणावर टीका केली होती. भारत सरकारने यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर थायलंड सरकारने कारवाई केली आहे. अधिकारी पिटफील्ड यांना राजदूत पदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यांना परिषद अर्धवट सोडून परत थायलँडमध्ये येण्यास सांगण्यात आले आहे.

थायलंडच्या विदेश सचिवांनी पिटफील्ट यांची जागा घेतली आहे. परिषदेचा पाचव्या दिवशी पिटफील्ट म्हणाल्या होत्या की, भारताचा सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एमएसपीवर तांदुळ खरेदी करण्याचा कार्यक्रम लोकांसाठी नाही, तर निर्यात बाजारावर ताबा मिळवण्यासाठीचे हे धोरण आहे. भारताने पिटफील्ट यांच्या या टिप्पणीनंतर थायलंडकडे आपला विरोध दर्शवला होता. तसेच डब्ल्यूटीओ प्रमुख, कृषी समितीच्या प्रमुख केन्या आणि यूएईकडे नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी संबंधितांनी गंभीर दखल घेतली आहे. अधिकारी म्हणाले की, थायलंड राजदूतांना बदलण्यात आले आहे. राजदूतांची भाषा आणि वागणे योग्य नव्हते.

पिटफील्टनी चुकीची माहिती समोर आणली
भारतीय अधिका-यांनी सांगितले की, पिटफील्ट यांनी चुकीची माहिती समोर मांडली. कारण, धान्य सुरक्षा अंतर्गत सरकार फक्त ४० टक्के धान्य खरेदी करते. इतर धान्य सरकारी मालकीच्या एजन्सी खरेदी करत नाहीत. शिवाय भारतातून बाजार किमतीवर आधारित निर्यात केली जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR