36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रदंगल घडविण्यास कारण ठरलेला फहिम खानचा व्हीडीओ पोलिसांच्या हाती; राजद्रोहाचा गुन्हा दाखल

दंगल घडविण्यास कारण ठरलेला फहिम खानचा व्हीडीओ पोलिसांच्या हाती; राजद्रोहाचा गुन्हा दाखल

नागपूर : प्रतिनिधी
नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. दंगल घडवण्यास प्रवृत्त करणारे १७२ व्हीडीओ सायबर पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे एक व्हीडीओ हा अटक करण्यात आलेला आरोपी फहिम खान याचा आहे.
दंगल घडवण्यास कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. फहिम खान हा दंगलीचा मास्टरमाईंड असल्याचा संशय पोलिसांना आहे.

डेमॉक्रॅटिक पार्टीचा नेता फहिम खान याच्या चिथावणीखोर वक्तव्यातून युवक एकत्र आले, त्यानंतर त्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केल्याचे पोलिस तपासात आढळले आहे. चिथावणीखोर भाषण करीत असतानाचा फहिम यांचा व्हीडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याची तपासणी सुरू आहे. सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली नागपूर पोलिसांनी सुरू केल्या आहेत.
पोलिसांनी १७२ व्हीडीओंपैकी ५७ व्हीडीओ व्हायरल करणा-यांवर कलम १५२ नुसार कारवाई केली आहे. भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आणल्या प्रकरणी आरोपींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केली आहेत. त्यानंतर मुस्लिम समाजाकडूनही आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दोन गटांत हिंसाचार झाला. वाहने, घरांवर समाजकंटकांनी दगडफेक केली. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

दंगल उसळल्यावर अनेकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याची माहिती समोर अली आहे. सायबर पोलिसांकडून १५७ व्हीडीओ तपासण्यात आले असून त्यातील ५७ व्हीडीओ पसरविणा-यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR