32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeलातूर‘दयानंद कला’ची निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

‘दयानंद कला’ची निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

लातूर : प्रतिनिधी
फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत दयानंद कला महाविद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्त्ता १२ वी बोर्ड परीक्षेत एकूण ३६० विद्यार्थी प्रवेशीत होते. त्यापैकी ३५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाचा निकाल ८७.७४ टक्के व लातूर विभागाचा निकाल ८४.१० टक्के लागला असून अस्मिता भास्कर शिंदे  ९४.५० टक्के गुण घेऊन महाविद्यालयात सर्वप्रथम आली आहे. ईश्वरी अमोद जोशी ९३.१७ टक्के, गुण घेऊन द्वितीय व  गार्गी संतोष बस्तापुरे ९२.५० टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे.
महाविद्यालयातील ८५ टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे गुणवंत विद्यार्थी-  श्वेता योगेश भोसले ८८.६७,  स्रेहा बालाजी मादळे ८७.६७, अपुर्वा कुलिंद मस्के- ८६.५०, समिक्षा दयानंद कर्वे- ८५.५०, ओमकार हरिदास उबाळे ८५.१७, रोहित बुद्धसिंह पाल ८५, अदिती राजेश्वर पाटिल ८५ टक्के तसेच विशेष प्राविण्यासह ३८, प्रथम श्रेणी ७५, द्वितीय श्रेणी १२८, तृतीय श्रेणी ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल त्यांचे अभिनंदन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, दयानंद शिक्षण संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष ललीतभाई शाह, उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. गोपाल बाहेती, प्रा. दशरथ ननवरे, प्रा. जिगाजी बुद्रुके, डॉ. सुधीर गाडवे, प्रा. दिनेश जोशी, प्रा. शिवाजी राठोड, डॉ. संदीपान जगदाळे, डॉ. दयानंद शिरुरे, डॉ. देवेंद्र कुलकर्णी, प्रा. शांता कोटे, प्रा. अंजली बनसोडे, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. मनोज गवरे, प्रा. रत्नाकर केंद्रे, प्रा. भिमराव बनसोडे मुख्य लिपीक श्री. संजय व्यास, सर्व
शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी इत्यादींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR