21 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeलातूरदर्जी बोरगाव येथे  दि. ३ ते १० फेब्रुवारीपर्यंत रामकथा 

दर्जी बोरगाव येथे  दि. ३ ते १० फेब्रुवारीपर्यंत रामकथा 

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापुर तालुक्­यातील दर्जी बोरगाव येथे श्री.सदगुरु चिन्­मयानंद स्­वामी महाराज यांच्­या समाधी शताब्दी महोत्सव  सोहळयानिमित्त दि. ३ ते १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत रामकथा ज्ञानयज्ञ आणि अखंड हरिनाम सप्­ताहाचे आयोजन करण्­यात आले आहे.
       दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री सदगुरु चिन्­मयानंद स्­वामी समाधी सोहळा साजरा होत आहे. दि. ३ फेब्रुवारी पासुन दु.१ ते ५ या वेळेत कथा प्रवक्­ता ह.भ.प. रामायणचार्य अ‍ॅड. शंकर महाराज शेवाळे पुणे यांची रामकथा होणार आहे. दैनंदीन कार्यक्रमात विष्­णु सहस्­त्रनाम,ह.भ.प.माऊली महाराज इके व दामोदर महाराज यांचे गाथा भजन, दुपारी रामकथा, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन, जागर, काकडा भजन, असे धार्मीक कार्यक्रम होणार आहेत. दि .३ फेब्रुवारीपासून अनुक्रमे ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर, ह.भ.प योगीराज महाराज गोसावी, ह.भ.प. अ‍ॅड शंकर महाराज शेवाळे, ह.भ.प विशाल महाराज खोले, ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील, ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे दररोज रात्री ९ ते १२ पर्यंत कीर्तन होणार आहे. दररोज रात्री १० ते १ या वेळेत संगीत भजन होणार आहे.
प्रेमराज मोहनराव आंदलगावकर, सुप्रयो मैतरो धृपद गायन कलकत्ता व उद्धवराव शिंंदे आपेगावकर, सुप्रसिद्ध गायक आकाशवाणी कलाकार पंडित  अजित कडकडे, पंडित विठ्ठल जगताप, मंगेश बोरगावकर, शंकरराव वैरागकर, सुरमणी बाबुराव बोरगावकर,तालमणी राम बोरगावकर, यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. श्री चिन्­मयानंद स्­वामी यांची पालखी मिरवणूक व कै.जोधाप्रसाद मोदी यांच्­या स्­मरणार्थ रात्री ८ वाजता शोभेची दारु उडविण्­याचा आयोजित कार्यक्रम तर शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी कै. लींम्मनआप्पा हलकुडे स्मरणार्थ श्रीचा अभिषेक सकाळी १० ते१ ह.भ.प जयवंत महाराज बोधले पंढरपूरकर यांचे काल्याचे कीर्तन तर समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. . श्री.च्­या समाधी सोहळयानिमित आयोजित सर्व कार्यक्रमास भाविक भक्­तांनी लाभ घ्­यावा, असे आवाहन देवस्­थान समिती व गावकरी मंडळाच्­या वतीने करण्­यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR