23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरदहावी, बारावी नंतरच्या रोजगार संधीबाबत तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

दहावी, बारावी नंतरच्या रोजगार संधीबाबत तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

लातूर : प्रतिनिधी
भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यासाठी लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविलेल्या अंदाजे अडीच हजार युवक-युवतींना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य कु. मनीषा बोरुळकर, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, आयएमसी ऑफ आयचे चेअरमन शिवानंद जवळे, दीपक गायकवाड, उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर, यावेळी उपस्थित होते.
इयत्ता दहावी, बारावी नंतरच्या करिअरच्या संधींची माहिती देण्यासाठी आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर हा अतिशय चांगला उपक्रम आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यातील योग्य करिअरची दिशा निवडण्यासाठी मदत होईल, असे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे.  विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी, ध्येय निश्चित मिळेल, असे आमदार काळे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घूगे यांनीही मार्गदर्शन केले.  प्रास्ताविक प्राचार्य बोरुळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दिशा निश्चित करून यश मिळविण्याबाबत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरात मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR